बाबा शेवटपर्यंत स्वत:ला ‘विद्यार्थी’च मानत
बाबांच्या अचानक निघून जाण्यानं ज्या ज्या वेळी निष्क्रिय हतबलता येते, त्या वेळी ‘स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली’ या सुरेश भटांच्या ओळींचे स्वर पेटीवर लीलया गोंजारणारे बाबा मला दिसतात. आणि जणू काही जाता जातासुद्धा मला माझ्या जीवनगीताची अर्थपूर्ण ओळ सुचवून जात आहेत असं वाटतं. मग माझं मन पुन्हा उभारी घेतं.......